Description
Amba Rahate Tuljapuri Nidra Kari Palangavari Ga | अंबा राहते तुळजापुरी निद्रा करी बाई पलंगावरी गं | Nidra kari palngavari | Aai Tuljabhavani Gondhal Geet | Marathi Devi Song 2026
गीत / संगीत/ गायक - Sonu Sathe
🙏🌺 जय आई तुळजाभवानी! आई राजा उदो उदो! 🌺🙏
आई तुळजाभवानीच्या चरणी समर्पित असलेले सुंदर मराठी भक्तिगीत “निद्रा करी पलंगावरी” आपल्या सर्व भक्तांसाठी सादर करीत आहोत.
आई तुळजाभवानीच्या भक्तीचा गोडवा, महाराष्ट्राची पारंपरिक गोंधळ गीताची परंपरा आणि आई भवानीच्या महिम्याचे दर्शन घडवणारे हे भक्तिगीत नक्की ऐका आणि भक्तिरसात तल्लीन व्हा. 🙏❤️
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच सुंदर मराठी भक्तिगीतांसाठी Channel ला Subscribe करा व Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका.
🌺 आई तुळजाभवानी आपल्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी ठेवो, हीच तिच्या चरणी प्रार्थना!
॥ आई तुळजाभवानी माता की जय ॥
॥ आई राजा उदो उदो ॥
Lyrics
कोणतं गाव आंबाच ग कुठ राहणं आंबाच ग
आंबा राहती तुळजापुरी ग
आंबा राहती तुळजापुरी
आंबा राहती तुळजापुरी निद्रा करी बाय पलंगावरी ग
आंबा उठून लव लाई ग
आंबा आंघोळीला जाई ग
कल्लोड गाय मुखाच्या तिरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....1
अश्विन शुद्ध प्रतिपदे ला ग
आई बसली सिंहासना ला ग
महाराणा त्या दरबारी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....2
भोपी टाकतो उद कार
झाली घोड्यावर स्वार ग
भोळ्या भक्ताला उद्धारी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....3
एकमेकाच्या काळजा मंदी ग
शिवशक्ती च वाहन नंदी
मारती रावळामधी फेरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....4
महिषासुराला कराया ठार ग
झाली वाघा वर स्वर ग
धरती हादरली सारी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....5
परंपरा ही चाले रुढ ग
तिला बसाया गरुड ग
शोभे भवानी राजेश्वरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....6
रथ अलंकार केला ग
राज हंस जोडला त्याला ग
सरस्वती महेश्वरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....7
मुरली अलंकार भारी ग
त्याला सिंहाची आहे स्वारी ग
नटली ब्रह्मांड सुंदरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....8
शेष शाही अलंकार ग
त्याला गरुडाचा भार ग
सेवा करतो विष्णू हरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....9
आईची सवारी हाय मोरे ग
हाती भवानी तलवार ग
शिवबा राजाला उद्धरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....10
महिषासुरमर्दिनी ग
बाई दसऱ्याच्या दिनी ग
बसुन आली हत्ती वरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग.....11
परंपरा ही चालत आली ग
होमात दिलाया आजा बली ग
अंबिका सत्वची ती खरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 12
सार गाव झालं गोळा ग
पलंग पालखी चा सोहळा ग
भक्त गण आनंद करी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 13
लुटती शिलंगनाच सोनं ग
आईच हरून जात भान ग
पाहून येती या तर तरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 14
आईला गोंधळी घालतो साद ग
त्याच्या सांभाळाचा नाद ग
घुमली संबळ ठेक्या वरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 15
पलंग घेऊन आला तेली ग
त्याच्या वरती झोपी गेली ग
आई घोर निद्रा करी ग
आई राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 16
कोजागिरी पौर्णिमेच्या दिनी ग
झोप पुर्ण केली तिनी ग
बसली पुन्हा ती दरबारी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 17
सोलापूरा हुन येती काठी ग
तुळजापुरात गाठी भेटी ग
प्रतिष्ठापना तिची करी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 18
आईचा मिरऊनी छबीना ग
झाला आनंद माझ्या मना ग
जोगवा मागुन घरो घरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 19
घेऊन भक्तीचा हा वसा
सोहळा पार पडला असा
विजयी हात सोनु शिरी ग
आंबा राहती तुळजापुरीं निद्रा करी बाय पलंगावरी ग... 20
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #निद्राकरीपलंगावरी #आईतुळजाभवानी #मराठीभक्तिगीत #गोंधळगीत #TuljaBhavani #MarathiDevotionalSong
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on Youtube, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : https://www.youtube.com/user/Sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : http://bit.ly/2zNlNE2